Saraswati Vidyamandir : सरस्वती विद्यामंदिरचा प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज : सरस्वती विद्यामंदिर (Saraswati Vidyamandir) तळेगाव दाभाडे येथील माध्यमिक विभागाचा भारत विकास परिषद यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या प्रांतस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला असून यामध्ये ईश्वरी धैर्यशील पंडित व समीक्षा महादेव बिराजदार या दोन विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत एकूण 15 गट सहभागी झाले होते. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, शिक्षण मंडळ सदस्य डॉक्टर ज्योती चोळकर, सदस्य विश्वास देशपांडे, सुनील आगळे, खजिनदार सुचित्रा चौधरी, मुख्याध्यापिका रेखा परदेशी, पर्यवेक्षिका सुरेखा रासकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Pimpri : नाल्यावरील बांधकामांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन; भारतीय मराठा महासंघाचा इशारा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.