Talegaon : सारिका शेळके यांची प्रचारात उडी

राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळकेंच्या प्रचारास जोमाने सुरुवात 

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके यांनी पहिल्याच दिवशी आपल्या पतिराजांच्या खांद्याला खांदा देऊन शेळके यांच्या प्रचारात उडी घेतली. यावेळी त्यांनी हजारो महिलांसोबत प्रचारात उडी घेत संपर्क साधला.

सारिका शेळके यांनी मावळ तालुक्यातील देहूरोड, इंद्रप्रस्थ सोसायटी, बारलोटा नगर, चिंचोली आदी परिसरात फिरून शेळके यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले.

सारिका शेळके यांनी मावळ तालुक्यात महिला सक्षमीकरणासाठी मोठी गरुडझेप घेतली आहे. महिला बचतगटाच्या माध्यमातून शिवणक्लास, फॅशन डिझायनिंग अशा विविध प्रकारचे मोफत क्लासेस घेऊन महिलांना रोजगाराची नवीन वाट दाखवली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील महिलावर्गात सारिका शेळके यांची मोठी लोकप्रियता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.