Pune News: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी सरोज पाटील

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी सरोज पाटील यांची एकमताने निवड झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते.

अंधश्रद्धानिर्मूलन समितीच्या अध्यक्ष पदासाठी अनेक कार्यकर्त्यांकडून सरोजताईंच्यानावासाठी आग्रह होता. आज झालेल्या ऑनलाईन कार्यकरणी बैठकीमध्ये सर्वकार्यकारी समिती व सल्लागार समितीने एकमताने सरोजताईंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्र अंनिसच्या विश्वस्तांनी देखील मान्यता दिली. सरोजताईंनी हि जबाबदारी स्वीकारण्याच मान्य केल्याने कार्यकर्तांनी आनंद व्यक्त केला.

अंनिस संघटनेतील कार्यकर्त्यांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. एन.डी.पाटील यांच्यानंतर कार्यकर्त्यांना सरोजताईंचा भक्कम आधार आहे असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. संस्थेचे संस्थपक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकरयांच्याशी अतिशय घट्ट असे वैचारिक नाते होते.

कोण आहेत सरोज पाटील?

अतिशय परखड, कार्यक्षम असलेल्या सरोज सत्यशोधक परंपरेतील विवेकवादी विचार उचलून धरणारे एन.डी. पाटील यांच्या पत्नी सरोजताई देखील स्वतः विवेकवादी वर्तन आणि तत्वनिष्ठ जीवन जगलल्या व्यक्ती आहेत. सरोजताईंनी बी.ए. बी.एड. केल्यानंतरची 10 वर्षे शिक्षक तसेच 25 वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे. शिक्षणापासून वंचीत अशा घटकांना मुख्य प्रवाहा आणून गुणवत्तापूरक शिक्षण देण्याचं काम केलं.

इस्लामपूर येतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या त्या सचिव आहेत. सरोजताई रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळ सदस्य आहेत.  विद्यार्थ्यांना सहभागी करून वक्ष लागवड व जोपासना ह्यासाठी शाळेला सतत सात वर्षे राज्यपालांच्या हस्ते देण्यात येणार ‘वृकष सन्मित्र’ पुरस्काराने सन्मानितकरण्यात आलेले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.