Dussehra 2021 : हरवत चाललेली ही अखंडता परत मिळवण्यासाठी मुलांनी इतिहास वाचला पाहिजे – सरसंघचालक मोहन भागवत

एमपीसी न्यूज – देशाला स्वातंत्र्य हे त्याग आणि बलिदानामुळे मिळालं, त्यामुळे इतिहासात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. देशात अनेक गोष्टींवरुन भेदभाव केला जात आहे. देशातील दोन राज्यांमध्ये गोळीबार केला जात आहे, त्यामुळे कुठेतरी हरवत चाललेली ही अखंडता परत मिळवण्यासाठी आणि पुन्हा त्या दुश्मनीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मुलांनी इतिहास वाचला पाहिजे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (दि. 15) केले. विजयादशमीच्या निमित्ताने नागपूर येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात भागवत बोलत होते.

कार्यक्रमप्रसंगी बोलताना मोहन भागवत म्हणाले, देशात चांगल्या वाईट घटना घडत असतात, त्यावर प्रतिक्रिया देताना प्रत्येकाने समाज तोडणारी नव्हे तर समाज जोडणारी भाषा करायला हवी. प्रत्येकाने मनात असलेली भेदभावाची भावना बदलली पाहिजे. व्यवस्था चालवणाऱ्याच्या मनात भेदभाव नसेल तर खरा उद्देश सफल होतो.

विजयादशमीच्या निमित्ताने बोलताना भागवत यांनी अनेक बाबतीत ‘स्व’चे महत्त्व समजावून सांगत त्याकडे लक्ष वेधून घेतले. शिवाय इतरही महत्त्वाच्या विषयांची जोड देत बिघडत चाललेल्या सद्यस्थितीवर सुद्धा त्यांनी भाष्य केले. भागवत म्हणाले, कोरोनाकाळात मुलांकडे मोबाईल आला. पण त्याचा वापर कशासाठी केला जातोय हे कोणीही पाहत नाही. देशातील तरुण ड्रग्जच्या प्रसाराला बळी पडतात. त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता वाढतेय, नवीन तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर केला जातोय. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणायला हवं.

दसऱ्याच्या निमित्ताने ‘या’ महत्त्वाच्या मुद्दयांवर आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले  –

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.