Nagpur News : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. संघाकडून ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणं असल्याने त्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या भागवत यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील रात्री उशिरा याबाबत ट्विट केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहनजी भागवत यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली. त्यांना लवकरच बरं वाटावं, अशी देवाकडे प्रार्थना करतो, असं गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.