Talegaon Dabhade : सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा पराक्रम महिलांना सतत प्रेरणा देणारा – सत्येंद्रराजे दाभाडे

स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती श्रीमंत उमाबाई दाभाडे यांची 268 वी पुण्यतिथी

एमपीसी न्यूज – महिला सशक्तीकरणाची सुरूवात ताराराणी साहेबांनी केली. सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा साम्राज्यात तलवार घेऊन युद्धाची रणांगणे फत्ते केली. मुघल आणि पेशवे यांना शिकस्त देण्याचा सरसेनापती उमाबाईसाहेब यांचा पराक्रम हा महिलांना सतत प्रेरणा देणारा राहिला आहे, असे प्रतिपादन दाभाडे सरकार घराण्याचे वंशज सत्येंद्रराजे दाभाडे यांनी केले.

स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती श्रीमंत उमाबाई दाभाडे यांची 268 वी पुण्यतिथी रविवारी (दि. 28) झाली. यानिमित्त तळेगाव दाभाडे येथील समाधी स्थळावर सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांच्या सहचारिणी याज्ञसेनीराजे दाभाडे, बंधू सत्यशीलराजे दाभाडे, दिव्यलेखा राजे दाभाडे, सामाजिक कार्यकर्त्या शबनम खान, सविता दाभाडे, रुपाली दाभाडे, इतिहास संशोधक कृष्णा दाभाडे, विनय दाभाडे, पत्रकार मनोहर दाभाडे आणि संपादक अमीन खान यांच्यासह अनेक मान्यवरांनी समाधीचे दर्शन घेत या शूर विरांगनेला अभिवादन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.