Chikhali : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – मुलगी झाल्याने विवाहितेला माहेरून परत सासरी घेऊन जाण्यासाठी पैशांची मागणी केली. तिचा छळ केला. हा प्रकार 18 डिसेंबर 2016 ते 30 जानेवारी 2020 दरम्यान जाधववाडी, चिखली येथे घडला.

याप्रकारणी 27 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेरून पैसे घेऊन ये, असे सांगून आरोपी यांनी फिर्यादी विवाहितेचा शारीरिक छळ केला. विवाहितेला 2017 मध्ये मुलगी झाली. त्यानंतर विवाहितेला माहेरून परत घरी घेऊन येण्यासाठी आरोपीं यांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली. माहेरून पैसे घेऊन ये, असे म्हणून छळ केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.