Pune : पूरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी ससूनचे ४२ डॉक्टरांचे पथक रवाना 

एमपीसी न्यूज – कोल्हापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी अत्यावश्यक औषधे व सर्जिकल साहित्य घेऊन बै. जी . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय पुणेचे पथक ४२ डॉक्टरांचे पथक (दि. १०) सकाळी रवाना झाले.

यामध्ये औषधवैद्यकशास्त्र, बालरोगशास्त्र, कान, नाक व घसाशास्त्र , शल्यचिकित्साशास्त्र,अस्थिव्यंगोपचार शास्त्र , त्वचा रोगशास्त्र, नेत्ररोगशास्त्र, जन औषधवैद्यकशास्त्र इ. विभागांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा या वैद्यकीय पथकात समावेश आहे. बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय पुणेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, सर्व विभागप्रमुख व डॉ.हरीश टाटिया यांचे मार्गदर्शन व सहकार्य या वैद्यकील पथकाला लाभले आहे. हे ४२डॉक्टरांचे पथक गरजू रुग्णांची तपासणी करून निदान व औषोधोपचार करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.