Pimpri : वालिया यांची सातारा निरीक्षक पदावर नियुक्ती

एमपीसी न्यूज –  महाराष्ट्र कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया यांची कॉंग्रेसच्या सातारा जिल्हा ग्रामिण निरीक्षक पदावर (अल्पसंख्यांक विभाग) नियुक्ती करण्यात आली आहे. ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष नदीम जावेद यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले.

वालिया हे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे खजिनदार, पंजाबी कला केंद्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड हौशी शरीर सौष्ठव संघटनांचे संस्थापक अध्यक्ष तसेच मानव अधिकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. वालिया यांना दिल्ली मधील राष्ट्रीय स्थरावरील राजीव गांधी शिरोमणी पुरस्कार, इंदिरा गांधी सद्‌भावना पुरस्कार आणि बेंगलुरु येथील राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार आणि पिंपरी चिंचवड भुषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.