Satara News : सातारा बसस्थानकातील पाच शिवशाही बस जळून खाक

एमपीसी न्यूज – सातारा बस स्थानकात आचानक लागलेल्या आगीमुळे पाच शिवशाही बसेस जळून खाक झाल्या. आज (बुधवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास ही आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार सातारा बसस्थानकात पाच शिवशाही बस उभ्या होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास यापैकी एका बसला अचानक आग लागली. या आगीमुळे कर्मचा-यांची धांदल उडाली. दरम्यान वाहतूक पोलिसांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारीच उभ्या असलेल्या पाचही शिवशाही बसेसनी पेट घेतला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, पाचही शिवशाही बसेस जळून खाख झाल्या आहेत. पोलिसांनी आगीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण अद्याप कारण अस्पष्ट आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.