Satara News : मांढरदेवची काळूबाई, पालीचा खंडोबा, चाफळच्या श्रीराम यात्रेसह साता-यातील बहुतांश यात्रा रद्द

एमपीसी न्यूज – वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील बहूतांश यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मांढरदेवची श्री काळूबाईची यात्रा, दावजी बुवाजीबाबा यात्रा, श्री यमाईदेवीची यात्रा, पालीच्या खंडोबाची यात्रा, चाफळ, पाटण श्रीरामची यात्रा व कळकजाई (माण) येथील सीतामाईची यात्रा रद्द करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मांढरदेवीच्या यात्रेला महाराष्ट्रासह विविध राज्यातून भाविक येत असतात. 16 जानेवारी पासून सुरू होणारी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी 10 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत जमावबंदी लागू केली आहे. तसेच, राज्य शासनाने रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदीचे आदेश जारी केल्याने जिल्ह्यातील इतर यात्रा देखील भरल्या जाणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

सातारा जिल्ह्यात जानेवारीपासून मोठ्या यात्रा आणि जत्रा भरतात, महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक या यात्रांना हजेरी लावत असतात. मात्र, मागील सलग दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे या यात्रा रद्द केल्या जात आहेत. यावर्षी यात्रा भरण्याची शक्यता असताना पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने तिस-या वर्षी देखील भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.