शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Satara News: आमदार रोहित पवारांचा अपघातग्रस्ताला मदतीचा हात, स्वत: ढकलत काट्यातील गाडी काढली बाहेर

एमपीसी न्यूज – कर्जत-जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी सहका-यांसोबत स्वत: रस्त्यालगत काट्यात गेलेली अपघातग्रस्त मोटार ढकलून बाहेर काढण्यासाठी मदत केली. तसेच पोलीस चौकशीला न घाबरता, कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मांडवे- पिंगळी (ता.माण) दरम्यान बुधवारी (दि.18) दहिवडीतील एका शेतक-यांच्या ओमिनी मोटारीचा अपघात झाला होता. दामोदर काटकर या शेतक-याची ओमिनी अपघातानंतर रस्त्याच्या खाली काट्यामध्ये गेली होती.दरम्यान, तेथून जात असताना आमदार रोहित पवार यांनी हा प्रकार पाहिला.

प्रसंगावधान राखत त्यांनी आपली गाडी थांबविली. अपघातस्थळी धाव घेत स्वत: काट्यातील मोटार ढकलत बाहेर काढली. तसेच काटकर यांना धीर देत रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली.

याबाबतची पोस्ट आमदार पवार यांच्या एका चाहत्याने समाजमाध्यमांवर शेअर केली आहे.

त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार म्हणतात, ‘पोलीस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळं वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो.

त्यामुळं माझं आवाहन आहे की कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा आणि पोलिसांनाही विनंती आहे, अशा लोकांना चौकशीसाठी त्रास देऊ नये’.

spot_img
Latest news
Related news