Talegaon Dabhade: सत्यम खांडगे याला ‘मास्टर ऑफ ग्लोबल बिझनेस’ अभ्यासक्रमात सुवर्ण पदक!

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील सत्यम गणेश खांडगे या युवकाने एस पी जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शिक्षण संस्थेतून ‘जागतिक व्यापार’ या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम (मास्टर ऑफ ग्लोबल बिझनेस) सुवर्ण पदकासह नुकताच यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. 

सत्यमला मानाचे सुवर्ण पदक एस. पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटचे डिन व नेटफ्लिक्स कोफाउंडर यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. तळेगाव दाभाडे येथील मामासाहेब खांडगे इंग्लिश स्कूलचे मुख्य प्रवर्तक, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या राष्ट्रीय शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे  वरीष्ठ उपाध्यक्ष गणेश वसंतराव खांडगे यांचे ते चिरंजीव आहेत.

एस. पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट हे जागतिक नामांकित 20 एमबीए प्रशिक्षण संस्थांपैकी एक आहे. हा अभ्यासक्रम सत्यम याने एस. पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटच्या ऑस्ट्रेलिया, सिंगापूर व दुबई येथील केंद्रांतून पूर्ण केला आहे.

सत्यमचे प्राथमिक शिक्षण तळेगाव दाभाडे येथील माऊंट सेंट ॲन काॅन्व्हेंट स्कूलमध्ये  झाले असून माध्यमिक शिक्षण निगडी येथील सेंट उर्सुला स्कूल, BBA (IB) इंदिरा कॅालेजमध्ये झाले आहे. त्यानंतर सत्यमने हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याच्या या सुवर्ण यशाचे संपूर्ण मावळ तालुक्यातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.