Saururja Krushipump : शेतकऱ्यांसाठी 90 ते 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप, अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली आहे. सौर कृषीपंपांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महा ऊर्जाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने  https://www.mahaurja.com  या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषी पंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.