Savaniee Ravindrra: सावनी रवींद्र सादर करतेय आषाढी एकादशीनिमित्त ‘मन जाय पंढरीसी’ ही ऑनलाईन वारी

Savaniee Ravindrra Presents 'Man Jai Pandharisi' Online Wari on the occasion of Ashadi Ekadashi शनिवारी (दि.२७) रंगणा-या या वारीत सावनी रवींद्र आणि कवी वैभव जोशी सहभागी होणार आहेत.

एमपीसी न्यूज- यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची वारी नेहमीसारखी होणार नाही. विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारक-यांचे दु:ख तो पंढरीनाथ नक्कीच जाणतो. पण त्याच्या भक्तीत खंड पडू नये म्हणून खास भक्तीगीतांची मैफल रंगणार आहे. युवा पिढीची सुरेल गायिका सावनी रवींद्र एक आगळीवेगळी वारी घेऊन आली आहे. ‘मन जाय पंढरीसी’ या भक्तीगीतांच्या ऑनलाईन लाइव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून सावनी विठ्ठलभक्तीची वारी घडवणार आहे.

शनिवारी (दि.२७) रंगणा-या या वारीत सावनी रवींद्र आणि कवी वैभव जोशी सहभागी होणार आहेत. त्यांना अनय गाडगीळ, नितीन शिंदे, अभिजीत भदे आणि नीलेश देशपांडे साथसंगत करणार आहेत.

याचे ऑनलाईन बुकींग सुरु झाले आहे. तिकीट बुक करण्यासाठी tugoz.com/mjp या लिंकचा वापर करावा. तसेच गुगल पे द्वारा तिकीट बुकींग करणा-यांनी पे लेटरच्या ऑप्शनचा वापर करावा.

ही ऑनलाईन वारी म्हणजेच भक्तीगीतांची मैफल भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजता, अमेरिकन वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता, इंग्लंडच्या वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता आणि संयुक्त अरब अमिरातीच्या वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे.

अधिक माहितीसाठी या 7447405844 या क्रमांकावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.