Savarkar Jayanti Special: क्रांतीसूर्य सावरकरांना ‘ने मजसी ने’ या गीतातून मानवंदना

Savarkar Jayanti Special: Tribute to Krantisurya Savarkar from the song 'Ne Majasi Ne'

एमपीसी न्यूज – क्रांतीसूर्य वि. दा. सावरकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक ज्वलंत योद्धे. येत्या गुरुवारी म्हणजे 28 मे रोजी त्यांची 137 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने प्रशांत दामले यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेल्या एका व्हिडीओतून मराठी कलाविश्वातील काही कलाकारांनी सावरकरांना मानवंदना दिली आहे. हा व्हिडीओ अभिनेते प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘यंदा आपण 28 मे 2020 रोजी सावरकरांची 137 वी जयंती साजरी करत आहोत. आम्हा कलाकारांकडून या क्रांतीसूर्याला ही एक मानवंदना’, असं कॅप्शन प्रशांत दामले यांनी व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये सावरकर यांच्या जीवनातील अनेक गोष्टी दाखविल्या आहेत. यात सावरकर यांचे काही जुने फोटो, त्यांचे कुटुंबीय, सावरकर कोठडी आणि त्यांचे पत्र अशा त्यांच्याशी निगडीत अनेक गोष्टी यात पाहायला मिळत आहेत.

वि. दा. सावरकर यांचं ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे गाणं ऐकल्यावर क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवल्याशिवाय राहात नाही. आपल्या भारतभूमीला भेटण्यासाठी आसुसलेल्या सावरकरांचे मनोगत सांगणारी ही कविता आजही त्यातील प्रखर देशभक्तीमुळे वंदनीय आहे.

ज्येष्ठ गायक, संगीतकार सुधीर फडके यांची महत्वाकांक्षी निर्मिती असलेल्या सावरकरांवरील आधारित चित्रपटात ब्रायटनच्या समुद्रकिना-यावर उभे असलेल्या सावरकरांनी समोरच्या समुद्राच्या साक्षीने व्यक्त केलेल्या या गीताने डोळे पाणावल्याशिवाय राहात नाहीत. त्या चित्रपटात सादर झालेल्या गाण्याची चाल सुधीर फडके यांची होती. मात्र या व्हिडिओत जे गाणे सादर झाले आहे त्याच्या मूळ गाण्याला चाल संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांची आहे. आणि हे गाणे मंगेशकर भावंडांनी गाऊन अजरामर केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.