Lonavala : डोंगरगावच्या उपसरपंचपदी सविता जायगुडे विजयी

एमपीसी न्यूज- डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सविता दिनेश जायगुडे यांची बहुमताने निवड झाली. डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक नंतर नवनिर्वाचित सरपंच सुनील येवले यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवड प्रक्रिया पार पडली.

उपसरपंच पदासाठी दोन सदस्यांचे अर्ज दाखल केले होते. यावेळी घेण्यात आलेल्या मतदानात सविता जायगुडे यांना सहा मते तर प्रदीप गंगाराम घोलप यांना चार मते पडली. जायगुडे ह्या दोन मतांनी विजयी झाल्या. नियंत्रण अधिकारी वाजेसा व ग्रामसचिव एस. आर. हुजरे यांनी निवडणुकीचे कामकाज पहिले.

यावेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य दत्ताभाऊ गुंड, शिवसेना उप तालुकाप्रमुख गबळू ठोबरे, माजी उपसरपंच संजय जायगुडे, चंद्रकांत गाडे, महादू जायगुडे, इंद्रजीत तिवारी, गबळू जायगुडे, राजेंद्र दळवी, दिनेश जायगुडे, सुभाष खोले, अशोक निकम, अंकुश जायगुडे, पंकज खोले, अनिता गोणते, नंदू जायगुडे, गोविंद लोहर , दिलीप उंबरकर, राजेश जायगुडे, शंकर लोहर, अशोक गाडे, रवींद्र जायगुडे, अंकुश गाडे, विशाल वाघमारे, अविनाश शिंदे, बाळासाहेब नाणेकर, किशोर थोरात, अमित राऊत, ग्रा.पं.सदस्य सतीश चव्हाण, स्मिता खोले, राजश्री दळवी, ज्ञानेश्वर वाघमारे तसेच डोंगरगाव ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्याकडून सहायक पोलीस उपनिरीक्षक निरंजन रनवरे व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.