Pimpri News : सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करावा – मराठा सेवा संघ

एमपीसी न्यूज : 3 जानेवारी 1831 या दिवशी जन्मलेल्या व शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी काम करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन सर्व भारतीयांनी महिला (Pimpri News) दिन म्हणून साजरा करावा असे अवाहन मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष अँड लक्ष्मण रानवडे यांनी केले. 

पिंपरी चौकातील क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मारकामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस सुरेश इंगळे , गोविंद खामकर यांनी शहर मराठा सेवा संघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  या वेळी  रानवडे बोलत होते ते पुढे म्हणाले, 8 मार्च हा जागतिक महिला दिन असला तरी महिलांच्या जीवनात त्यांना प्रथम शिक्षणाच्या सुरुवात करून भारतातील वर्णव्यवस्थेत स्त्रीला कस्पटाप्रमाणे ठेवले जात होते अशा काळात सावित्रीबाई फुलेंनी भारतीय महिलांच्या शिक्षणाचे महान कार्य करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिन महिला दिन साजरा करावा .

ज्या  प्रमाणे जागतिक शिक्षक दिन 5 सप्टेंबर साजरा केला जात असतो तरीही जगात अमेरिका 7 मार्च , चीन 10 सप्टेंबर , सिंगापूर 5 सप्टेंबर , कोरिया 15  मे , टर्की 24 नोव्हेंबर असे वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या दिवशी शिक्षण दिन साजरे केले जातात. त्याच प्रमाणे भारतात 5 सप्टेंबर हा दिवस (Pimpri News) डॉ . सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिन साजरा केला जातो. त्याच प्रमाणे महिला दिन 8 मार्च  ऐवजी सावित्रीबाईच्या (3 जानेवारी) जन्मदिनी महिला दिन साजरा करण्या यावा ,असे  रानवडे यांनी यावेळी प्रतिपादन केले.

यावेळी उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव , सहसचिव सचिन दाभाडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.