Pune: पुणे विद्यापीठाकडून प्रवेश परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, उद्यापासून ऑनलाईन अर्ज उपलब्ध

savitribai phule pune university announces schedule for entrance exams

एमपीसी न्यूज- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या प्रवेश परीक्षांसाठी दि. 1 जूनपासून (सोमवार) ऑनलाईन अर्ज उपलब्ध होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख दि. 30 जून आहे.

‘कोरोना’मुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा खोळंबल्या आहेत. त्याचे नियोजन सुरू असतानाच आता पुढील वर्षाचे नियोजनही करावे लागत आहे. पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह देश, विदेशातील विद्यार्थी परीक्षा देतात.

विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत. त्याचा निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना 500 रुपये शुल्क तर मागासप्रवर्ग गटातील विद्यार्थ्यांसाठी 350 रुपये शुल्क आहे. विद्यार्थ्यांना शुल्क ऑनलाईनच भरावे लागणार आहे.

पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे 77 विभाग आहेत. त्यांच्यासाठीही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करताना मागील वर्षाची उत्तीर्णतेची गुणपत्रिका, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र याचे फोटोकॉपी अपलोड करावी लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक आहे.

प्रवेश परीक्षेसाठी लिंक –
https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.