Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम बदलला, ‘क्रेडीट प्रणाली’ सुरू होणार

Savitribai Phule Pune University changes second year syllabus , 'Credit System' will be introduced.

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले विद्यापीठाने पदवीधर आणि पदव्युत्तर द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम आगामी वर्षांपासून बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी पासून या  विद्यार्थ्यांचे ‘चाॅईस बेसड क्रेडिट सिस्टम’ (CBCS) नुसार मूल्यमापन केले जाणार आहे. विद्या परिषदेच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन,  मानववंशशास्त्र आणि चार विद्याशाखांचे प्रस्ताव यावेळी सादर करण्यात आले.

विद्यापीठाने मागील वर्षी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘क्रेडीट प्रणाली’ लागू केली होती आणि यंदा दुसर्‍या वर्षी लागू करण्याची मान्यता देण्यात आली आहे.

बीए, बीकॉम, बीएससी, एमए, एमकॉम, एमएससी, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, एमबीए, फार्मसी, सर्व पदवी व पदव्युत्तर द्वितीय वर्षाचे अभ्यासक्रम असणार आहेत. या नवीन बदलासह, आठ ते दहा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

विद्यापीठाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा, तसेच त्यांनी नोकरी करण्यायोग्य व्हावे आणि त्यांच्यात नवीन कल्पना विकसित व्हाव्यात या उद्देशाने  अभ्यासक्रम बदलला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नाविन्य आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.