Mukundnagar: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास उद्यापासून प्रारंभ

एमपीसी न्यूज – भारतीय संगीत विश्वात पुण्याचे नाव उंचावणारा आणि संगीत रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा 67 वा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ येत्या 11 डिसेंबरपासून येथे सुरू होणार असून तो 15 डिसेंबर पर्यंत रंगणार आहे.

मुकुंदनगरमधील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे हा महोत्सव घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे प्रतिवर्षी आयोजीत केला जाणाऱ्या या संगीत महोत्सवाची उत्कंठा प्रत्येक संगीत रसिकाला असतेच असते.

या महोत्सवाच्या तयारीबाबत बोलताना आयोजकांनी सांगितले की या महोत्सवासाठी २७० बाय २२८ फूट एवढा शामियाना तयार करण्यात आला असून या ठिकाणी तब्बल १० हजार रसिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय बैठक आणि खुर्ची अशा स्वरूपात ही बैठक व्यवस्था असणार आहे. याशिवाय संपूर्ण मंडपात ६ एलईडी स्क्रीन्सवर देखील रसिकांना महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.