Hinjawadi News : पतीसोबत वाद मिटवून देतो असे सांगून दिराने जवळीक साधली अन्… 

एमपीसी न्यूज – पती सोबत सुरू असलेला वाद मिटवून देतो असे सांगून मावसदिराने जवळीक साधली. आणि पती सोबत घटस्फोट घेण्यासाठी दबाव आणून 55 वर्षीय मावसदिराने विवाहितेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये हिंजवडी परिसरात हा प्रकार घडला. 

याप्रकरणी 31 वर्षीय पिडित महिलेनं शुक्रवारी (दि.14) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 55 वर्षीय इसमाविरोधात भारतीय दंड विधान कलम 354, 354 (अ), 506, 507 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांचे पती यांचा वाद सुरू आहे, याचा गैरफायदा घेऊन आरोपी मावसदिराने फिर्यादी यांच्या सोबत जवळीक साधली. पती सोबत वाद मिटवून देतो असे सांगून वारंवार जवळ येत विनयभंग केला. तसेच पतीसोबत घटस्फोट घेण्यासाठी दबाव आणला व वारंवार फोन करून त्रास दिला असे फिर्यादीत नमूद केले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.