Chinchwad News :  ‘हप्ता का दिला नाही’ म्हणत कोयत्याच्या धाकाने दुकानातून जबरदस्तीने रोकड पळविली

0

एमपीसी न्यूज – तिघांनी मिळून एका भंगार दुकानदाराला ‘हप्ता का दिला नाही’ असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवला. तसेच त्याच्या दुकानातून जबरदस्तीने अडीच हजारांची रोख रक्कम चोरून नेली. दरम्यान आरोपींनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. ही घटना मंगळवारी (दि. 4) दुपारी मोरयानगर, चिंचवड येथे घडली.

यासीम याकुब शेख (वय 24, रा. मोरया नगर चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अण्णा हजारे रा. वेताळ नगर चिंचवड अमित उर्फ गोट्या अण्णा जाधव महादु वाघमारे राहणार लींक रोड चिंचवड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आम्ही तिचा भाऊ याला ताब्यात घेतले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भंगारचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ यांच्या दुकानात बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. हप्ता का दिला नाही या कारणावरून आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील अडीच हजार रुपये बळजबरीने चोरून नेले.

जाताना दुकानाजवळ जमा झालेल्या लोकांना मोठमोठ्याने शिवीगाळ करून हातातील कोयते नाचवत जर कोणी पुढे आले तर तोडून टाकेल अशी धमकी देत दहशतीचे वातावरण निर्माण केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment