SC Result : सुप्रीम कोर्टाची तूर्तास सुनावणी नाही; निर्णय लांबणीवर

एमपीसी न्यूज : आज सर्वोच्च न्यायालयात (SC Result) एकनाथ शिंदे यांच्यासोबत 16 बंडखोर आमदारांचे भवितव्य ठरवणार होते. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लांबणीवर गेला आहे.

सर्वोच्च न्यायालय शिवसेनेतील बंडाळी प्रकरणी घटनापीठ गठीत करणार आहे. लगेच सुनावणी होणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे.

SC Result : एकनाथ शिंदे यांच्यासोबत 16 बंडखोर आमदारांचा आज ‘सुप्रीम’ निकाल

कोर्टाचा निर्णय होईपर्यंत मूळ शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी न घेण्याची विधानसभा अध्यक्षांना सरन्यायाधीशांनी सूचना दिली आहे. या निर्णयानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता. परंतु, हा निर्णय घाईत घेता येणार आहे नाही असे कोर्टाने म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.