Scholarship Exam News : पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 23 मे 2021 रोजी सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8वी) पुढे ढकलण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या बाबतचे प्रसिद्धी पत्रक ट्वीटरवर शेअर केले आहे.

पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 23 मे 2021 रोजी सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी होणार होती. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची पुढील तारीख योग्य वेळी कळवण्यात येईल, असे या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.