School Diwali Vacation : शाळांना 12 ते 16 नोव्हेंबपर्यंत दिवाळी सुट्टी

एमपीसी न्यूज – राज्यातील पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना 12 ते 16 नोव्हेंबर अशी फक्त पाच दिवस दिवाळी सणाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाइन अध्यापनही बंद राहील, असे शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे चालू शैक्षणिक वर्षांत शाळा सुरू करणे शक्य झाले नाही. परंतु 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले. प्रत्यक्ष शाळा सुरू न करता 22 जुलैपासून पूर्व प्राथमिक ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणास सुरुवात करण्यात आली. शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्याबाबत शासनस्तरावर विचार सुरू होता.

_MPC_DIR_MPU_II

माध्यमिक शिक्षण संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षांतील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, तसेच कामाचे एकूण दिवस 230 होणे आवश्यक आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे एकूण दिवस 200 व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे दिवस 220 होणे आवश्यक आहे.

शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सणाची शाळा सुट्टी घोषित करण्यात येत आहे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या कालावधीत शाळांमार्फत ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असे जाहीर करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.