Pimpri : शाळा नियंत्रणाचे काम पर्यवेक्षकांकडे 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 105 शाळांवर नियंत्रण ठेवणे, गुणवत्ता वाढ करणे अशा अनेक जबाबदा-या आता पर्यवेक्षकांकडे दिल्या आहेत. यामध्ये महापालिका, खासगी व अनुदानीत अशा सर्व शाळांचा समावेश आहे. शहरातील सात पर्यवेक्षकांवर 105 शाळा व 88 इमारतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शिक्षण समितीच्या बैठकीत पर्यवेक्षकांना कर्तव्य ठरवून देण्यात आले आहेत. महापालिकेकडे सात पर्यवेक्षक आहेत. त्यांच्यावर शाळांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबरोबरच शाळांची वार्षिक तपासणी, अहवाल सादर करणे, शाळांच्या तक्रारींचा पंचनामा करणे, खासगी शाळांमध्ये ‘आरटीई’  अंतर्गत होणा-या 25 टक्के प्रवेशाची माहिती घेणे, दहावी व बारावीसाठी भरारी पथकात काम करणे, शिक्षक व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण याचे नियोजन व नियंत्रण करणे.

गोपनीय अहवाल सादर करणे, शाळेचे साहित्य वाटप झाले की नाही याची पाहणी करणे, गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवणे. शाळेतील पोषण आहार, शाळेच्या वेळापत्रकानुसार तास घेणे, शाळांच्या इमारतीचीही पाहणी करुन दुरुस्तीची कामे करवून घेणे ही कामे पर्यवेक्षकांना देण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.