Pimpri News : शालेय पोषण आहारात काचा, प्लास्टिक, अळ्या आढळून देखील संबंधित संस्थेवर कारवाई न करणा-या शिक्षण विभागाच्या उपायुक्तांना निलंबित करा

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील गोर-गरिब विद्यार्थ्यांना शासन अनुदानातून शालेय पोषण आहार पुरविला जातो. मात्र, या शालेय पोषण आहारात दिल्या जाणा-या खिचडीत चक्क काचा, प्लास्टिकचे तुकडे आणि आळ्या आढळून आल्याचे प्रकार घडले आहेत.(Pimpri News) शाळांच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या तक्रारींमुळे सावित्री महिला स्वयंरोजगार नावाच्या संस्थेकडून पुरविल्या गेलेल्या भातात चक्क केस, आळ्यांसह काचेचा, प्लास्टिकचा तुकडा आढळून आल्याने ही गंभीर बाब समोर आली आहे.

याच संस्थेच्या शालेय पोषण आहाराबाबत वेगवेगळ्या सात शाळांमधून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.तरी देखील शिक्षण विभाग आणि या विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी दिलेल्या नोटिसांना देखील संबंधित संस्थेने जुमानले नाही. त्यांनी दिलेल्या नोटीसांमध्ये शालेय पोषण आहारात आळ्या, काचा व प्लास्टिकचे तुकडे आढळल्याचा उल्लेख आहे. मात्र, उपायुक्त खोत यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या संस्थेचे आणि उपायुक्त संदिप खोत यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय आहे.

Pimpri News : मोरे, चिलेकर, लांडगे यांना सृजन प्रतिष्ठानचा समाजदूत पुरस्कार जाहीर

या संस्थेच्या शालेय पोषण आहाराबाबत पहिली तक्रार 25 ऑगस्ट 2022 रोजी प्राप्त झाली होती. त्यानंतर वारंवार शालेय पोषण आहाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या.(Pimpri News) तरीही शिक्षण विभागाच्या उपायुक्तांनी कारवाई न करता संबंधित संस्थेला पाठिशी घातल्याचे दिसते. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकार्‍यांना तत्काळ निलंबित करावे अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.