Pimpri : पवनानदी जलमैत्री दशकपुर्ती सोहळ्यानिमित्त शालेय चित्रकला स्पर्धा

एमपीसी न्यूज – जलदिंडी प्रतिष्ठान ही संस्था गेल्या १६ वर्षांपासुन पुण्यामध्ये नदीवर संवर्धन, जनजागृती व नदीखोरे एकत्रित करण्याचे काम करित आहे. महाराष्ट्रामध्ये सुमारे १४ नद्यांवर जलमैत्री अभियान राबविण्यात येत आहे. पिंपरी चिंचवडची जीवनदायनी पवनानदीवर अशाप्रकारचे जलमैत्री अभियान २००८ पासुन राबविण्यात येत आहे. या वर्षी पवना जलमैत्री अभियान आपल्या सारख्या हितचिंतक व सहभागामुळे एक दशक यशस्वीपणे पुर्ण करीत आहे.

आजच्या नदीचे चित्र व सुमारे चाळीस वर्षापुर्वीचे चित्र यात जमिन आस्मान इतका फरक आहे.ज्या नदीस आपण माता, आई म्हणतो ती आता आजारी झाली आहे. याला लोकसंख्येचा विस्फोट, औदयोगिकीकरण, पाश्चात्य जीवनशैलीचे अंधानुकरण व अंधश्रध्दा असे अनेक घटक कारणीभूत आहेत. आज गावोगावच्या नदया सांडपाण्याच्या गटारी झालेल्या दिसतात. तर यापुढे काळजी न घेतल्यास नदीचे भेसुर परीस्थितीचे गांभीर्य कमालीचे विदारक बनेल या बद्दल तिळमात्र शंका नाही. हया सर्वांचे गांभीर्य लक्षात घेऊन भविष्य काळातील पुढच्या पिढीकरता, नदी वाचविण्यासाठीची गरज काही सामाजिक संस्था व पर्यावरण मित्रांनी ओळखली. अश्या हया विचारांनी प्रेरीत होउन पिंपरी चिंचवड मध्ये वाहणारी, उदयोग नगरीची जीवनदायनी असलेल्या अशा पवना नदीसाठी काही समविचारक व सामाजिक भावनांची जाणीव असणारे जलमित्र एकत्र आले. या पवना जलमैत्रीची दहा वर्ष पुर्ण झाली असुन त्याचे चळवळीत रुपांतर झाले आहे.

या दशकपुर्ती सोह्ळ्यानिमित्त नानाविध कार्यक्र्माचे आयोजन करण्याचा मानस आहे. यंदा बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात ८ वी इयत्तेच्या पुस्तकांत जलदिंडीचा धडा आहे व या वर्षी आपल्या
मुलांना जलदिंडीचा प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. सदर पवनाजलदिंडीची सुरवात दरवर्षीप्रमाणे २० डिसेंबर रोजी संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त पवनानगर पासुन होणार असुन सांगता समारंभ २१ डिसेंबर संत मोरया गोसावी समाधी स्थळ चिंचवड येथे होणार आहे. पुढील पिढीला नदीविषयी माहिती व आस्था निर्माण व्हावी या साठी ह्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदर चित्रकला स्पर्धा जलदिंडीच्या द्शकपुर्ति सोहळा निमित्ताने भावसार व्हिजन इं पिंपरी चिंचवड व जलदिंडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.