School Reopen : राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार – वर्षा गायकवाड 

एमपीसी न्यूज – राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील. अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, 5 ते 8 वीच्या शाळा सूरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असून येत्या 27 जानेवारीपासून 5 ते 8 वीच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने सर्व खबरदारी घेणं आवश्यक आहे. येणाऱ्या काळात याबाबत एसओपी जाहीर केल्या जातील असे त्या म्हणाल्या.

कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like