Talegaon Dabhade: शाळा महाविद्यालयांमध्ये सुट्टीमुळे शुकशुकाट!

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहर परिसरातील बालवाड्या, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, इंजिनीअरीग कॉलेज आदी शैक्षणिक संस्था कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याकरिता बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळा परिसरात शुकशुकाट अनुभवायला मिळत आहे.

 

शासनाच्या आदेशानुसार तळेगाव दाभाडे नगर परिषद मुख्याधिकारी दीपक झिंजाड व प्रशासन अधिकारी संपत गावडे यांनी सर्व शैक्षणिक संस्थाना आदेश बजावलेल्या आदेशानुसार  शैक्षणिक कामकाज बंद ठेवण्यात आले होते. मात्र शाळातील सर्व शिक्षक  कार्यालयामध्ये उपस्थित होते.

 

तळेगावात शहरात एकूण ३० प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील शैक्षणिक संस्था आहेत. यामध्ये एकूण १६ हजार ५५५ विद्यार्थी  शिक्षण घेत आहेत.याशिवाय कनिष्ठ महाविद्याल, व वरिष्ठ महाविद्याल यांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

 तळेगाव शहरातील इयत्ता १० ची शालांत परीक्षा व्यवस्थित पणे चालू आहे.  शासनाच्या आदेशानुसार  विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली असली तरी सर्व शिक्षक, सेवक मात्र कामावर हजर होते. वरिष्ठांनी त्यांना शालेय नियोजनातील कामे करावयास सांगितले आहे.

 

 शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने बसगाड्या व इतर वाहने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शाळा परिसरात शुकशुकाट होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.