Pune : शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञानावर आधारित प्रकल्प तसेच, चित्रकला, निबंध, एकपात्री स्पर्धा

विद्यापीठाचा ‘सायन्स पार्क’ व ‘खुला आसमान’ संस्थेचा उपक्रम

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सायन्स पार्क आणि खुला आसमान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञानावर आधारित विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यात विज्ञान प्रकल्प, चित्रकला, निबंध आणि एकपात्री प्रयोग अशा स्पर्धांचा समावेश आहे.

या स्पर्धा ८ फेब्रुवारी २०२० रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स पार्कमध्ये (पर्यावरणशास्त्र विभागाची इमारत) होणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना विनामूल्य सहभागी होता येणार आहे. त्यासाठी नावे नोंदवणे आवश्यक आहे. सायन्स पार्कच्या पुढील वेब पेजवर नावे नोंदवता येतील- http://sciencepark.unipune.ac.in/Eventd.php

विज्ञान प्रकल्पासाठी सोमवार, २७ जानेवारी २०२० पर्यंत नावे नोंदवता येतील. चित्रकला, निबंध आणि एकपात्री प्रयोग या स्पर्धांसाठी नावे नोंदवण्याची मुदत ५ फेब्रुवारी २०२० पर्यंत ठेवण्यात आली आहे. विद्यार्थांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक व्हावा या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धा मराठी, हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत देता येणार आहेत, अशी माहिती ‘सायन्स पार्क’च्या हर्षदा बाबरेकर यांनी दिली.

विविध स्पर्धांचे वयोगट तसेच, त्या त्या स्पर्धांचे नेमके विषय याबाबतचे तपशील सायन्स पार्कच्या वेब पेजवर उपलब्ध आहेत. या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही सायन्स पार्कतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.