Pimpri : श्री छत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात रविवारी विज्ञान प्रदर्शन

एमपीसी न्यूज – भारतीय अवकाश विज्ञान संस्थेचे संस्थापक थोर वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांचे भारतीय अवकाश विज्ञानात मोलाचे योगदान आहे. दि. 12 ऑगस्ट हा डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्मदिन. या निमित्त चिंचवड येथील विकास शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 

हे प्रदर्शन इस्रो अहमदाबाद, इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट पुणे, पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क तसेच स्पेस सायन्स आणि खगोल शिक्षण फोरमच्या संयुक्त विद्यमाने विकास शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाअंतर्गत दि. 12 ऑगस्टला रविवारी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत विद्यालयात विज्ञान प्रदर्शन होणार आहे. यावेळी इस्रो सेलचे अध्यक्ष डॉ. एम. सी. उत्तम, जयंत जोशी, डॉ. सी.एम. नागरणी तसेच अरुणकुमार सिन्हा हे इस्रो अहमदाबाद, गुजरात येथील वैज्ञानिक उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जाधव, इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट पुण्याचे संतोष पिसे, अनिल करपे, प्रशांत डोंबरीवाल, सायन्स पार्कचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे आदींनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.