Scorpio – Annual Horoscope 2020-2021: वृश्‍चिक राशीच्या व्यक्तींना राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेच्या पदांचा योग

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात वृश्चिक राशीचे वार्षिक राशी भविष्य 2020-2021. वृश्चिक राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार गेली 12 वर्षे आम्ही एमपीसी न्यूजसाठी वार्षिक राशी भविष्य लिहित आहोत. ज्योतिषशास्त्राच्या विविध अंगांचा विचार करून आम्ही वार्षिक राशी भविष्याचे लेखन केले आहे. प्रत्येक ग्रहाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो व प्रत्येक ग्रहाची गती कमी-जास्त असल्यामुळे आपण जास्त काळ एका राशीत राहणार्‍या ग्रहाचा परिणाम कसा होईल, त्यांचे विवेचन राशी व नक्षत्रानुसार केले आहे.

ग्रहांची मानसिकता शास्त्र व राशीप्रमाणे बदलते. काही ग्रह जगणे नकोसे करणारे वाटतात, परंतु तेथे ग्रह थोड्या कालावधीनंतर आनंद देणारे ठरतात. सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन हे कुटुंब, मित्र परिवार व नोकरी व्यवसाय यांनी व्यापलेले असते. यात काही शुभ घटना घडल्या की मनुष्य आनंदी होतो. परंतु अप्रिय घटना घडल्यास मनुष्य दु:खी होतो.

आम्ही वार्षिक़ राशी भविष्य लिहिताना प्रमुख अंगांचा जास्त विचार करून लिखाण केले आहे. तसेच उपासना ही या वर्षीच्या ग्रह गोचरीनुसार प्रत्येक राशीस सुचवली आहे. तसेच प्रत्येक राशीला शुभ रंग, भाग्य रत्न, शुभदिनांक व शुभकारक वयवर्षे आम्ही सुचविलेली आहेत. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेतल्यास आपले कार्य सिद्धीस जाईल, असे वाटते.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्यचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

वृश्‍चिक : राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेच्या पदाचा योग

वृश्‍चिक रास ही राशी चक्रातील आठवी रास असून विंचू हे या राशीचे प्रतीक आहे. हि जल तत्वाची व स्थिर रास असून बहु प्रसव रास आहे. या राशीचा स्वामी मंगळ असून या राशीच्या व्यक्तीकडे असामान्य धैर्य, दृढ इच्छाशक्ती, विलक्षण मनोबल या गोष्टी असतात.

काम पूर्ण करण्याची चिकाटी, जे सातत्य लागते ते आपणाकडे असते. आत्मसंयम, विवेक, निग्रह, निश्‍चयात्मकता निर्धार या गोष्टी यशासाठी लागतात त्या आपणाकडे आहेत. अखंडपणे अविरतपणे काम करण्यामुळे आपण यश मिळविता.

एखाद्या गोष्टीत मन लावून काम करणे, ध्येय लक्ष ठेवून काम करणे. अत्यंत उत्साहाने आशावादीपणे तडफेने काम करणारी न डगमगणारी, हार न माननारी, कार्यक्षेत्रावर आपली चमक दाखविणारी, आपली रास आहे.

त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी धाडसाची आत्मविश्‍वासाची कामे असतात त्या ठिकाणी आपण यशाच्या टोकापर्यंत जाणे, एखाद्या क्षेत्रात उच्चांक प्रस्थापित करणे.
यामध्ये वृश्‍चिक राशीचे व्यक्ती अधिक आढळतात.

आत्मसंयम, मनोबल, विवेकशक्ती या गोष्टी आपणाकडे मोठ्या प्रमाणावर असतात. आपल्या कार्यशक्तीवर, बुद्धीमत्तेवर आपल्या अंगभूत गुणावर प्रचंड विश्‍वास असतो. चिकाटी, सातत्य आत्मविश्‍वासामुळे स्पर्धापरीक्षा यामध्ये वृश्‍चिक राशीचे व्यक्ती भरपूर आढळतात.

सैन्य व पोलीस दलात वृश्‍चिक राशीची व्यक्ती विशेष कामगिरी करतील. मोठ्या कामात ते पुढे येवून जबाबदारी घेतील. वृश्‍चिक राशीस परिक्षण करणे हे थोडे अवघड असते. कारण या राशीमध्ये अत्यतं टोकाच्या चांगल्या व अत्यंत टोकाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती आढळतात.

कारण या राशीचा स्वामी मंगळ तो कशाप्रकारे त्याच्या जन्मपत्रिकेत आहे त्यानुसार ठरते. तर वृश्‍चिक राशीत विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा ही नक्षत्रे येतात. तर वृश्‍चिक रास विशाखा नक्षत्र असणार्‍या व्यक्ती अल्प क्रोधी लहान कारणावरून रागीटपणा करणारे, प्रवासाची आवड असणारी गुप्तकार्य हट्टी, सूडपणा वादविवादप्रिय तर वृश्‍चिक रास अनुराधा नक्षत्रामधील व्यक्ती सौंदर्याची आवड, कपडेलत्ते, दागिने, प्रवास यांची लालसा असते.

धनवान, संसारिक वृत्तीच्या गोड बोलणार्‍या दूर प्रवास करण्यात आनंद मानणार्‍या तर वृश्‍चिक रास ज्येष्ठा नक्षत्र हे लोक संतोषी, घातकी, आप मतलबी धार्मिक उपद्रवी नेहमी संकटातून पळ काढणारी उत्तम स्मरणशक्ती असणारे व्यक्ती असतात.

अशा गूढ स्वभावाच्या वृश्‍चिक राशीचे चालू वर्ष कसे राहील…

आपल्या राशीच्या तृतीय स्थानातून व चतुर्थ स्थानातून गुरुचे भ्रमण होणार असून मोठे करार होतील. सतत प्रवास होतील. भावंडाविषयी चांगल्या घटना घडतील. महत्वाची कागदपत्रे होतील. नाव लौकीक वाढेल, पदवी/पुरस्कार/प्रसिद्धी/मानसन्मान होईल. खेळ/कला/साहित्य/कर्मत्व पराक्रम घडेल.

मोठी कामे हातून होतील. शिक्षणासाठी प्रवास. घरात मंगल कार्य तरुणाचे विवाह अशा घटना घडतील. भागिदारीतील पूर्वार्ध यशकारक आहे. मनासारख्या घटऩा घडतील. मित्र, सहकारी यांची मोलाची मदत मिळेल. एप्रिल 2021 पर्यंत सर्व कामे सुरळीत होतील.

वारसा हक्क/विमा/प्रॉपर्टी विषयाची कामे एप्रिल 2021 नंतर मार्गी लागतील. सेकंड होम/ जोडीदाराच्या नोकरी अथवा व्यवसायाची प्रगती दर्शविते. तर राशीच्या तृतीय स्थानी शनिचे भ्रमण होत असून कर्तृत्वाची नवीन संधी प्राप्त होईल.

कला / खेळ/साहित्य क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना शुभकारक वर्षे आहे. जागा, घर, प्रॉपर्टी यांची कागदपत्रांची कामे पूर्ण होतील. शेअर्समध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्यास अनुकूल काळ राहील. प्रसिद्धी मिळेल, यात्रा मंगल कार्यमध्ये आपला सहभाग इतरांना चकीत करणारा राहील.

विद्यार्थी वर्गाला नवीन अ‍ॅडमिशन किंवा प्रवेश संथ गतीने होईल. तर राशीच्या सप्तम स्थानातून व आपल्या राशीतून राहू केतूचे भ्रमण होणार असून द्विधा मनस्थिती राहील. जोडीदाराशी दुरावा स्वभावात मतभिन्नता मोठे निर्णय चुकण्याची शक्यता राहील.

भागीदाराशी व्यवसायात कटकटी निर्माण होतील. डोक्याचे विकार/हितशत्रूंचा त्रास या गोष्टीची दक्षता घ्यावी. मोठे खर्च करताना काळजी घ्या. एकंदरीत हे वर्ष कायदेशीर कामात यश/राजकीय सामाजिक क्षेत्रात मान सन्मान प्रतिष्ठा पद प्राप्ती यासाठी अनूकूल आहे.

उपासना : शिवशंकर उपासना अनुकूल राहील. सफधान्याचे दान, रुद्राभिषेक केल्यास येणार्‍या अडचणी कमी होतील.

शुभरंग : गुलाबी, लालसर, मरून

भाग्यकारक रत्न : आपण, पुष्कराज व माणिक रत्नाचा वापर करावा.

शुभदिनांक : कोणत्याही महिन्याच्या 18, 21, 27

भाग्यकारक वयोवर्ष : 20, 24, 38, 42, 47, 56.

Aries – Annual Horoscope 2020-2021: मेष राशीसाठी यशकारक वर्ष

Taurus – Annual Horoscope 2020-2021: वृषभ राशीच्या व्यक्तींची यशाकडे वाटचाल

Gemini – Annual Horoscope 2020-2021: मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत मोठे बदल

Cancer – Annual Horoscope 2020-2021: कर्क राशीच्या व्यक्तींच्या व्यावसायिक प्रगतीचे वर्ष

Leo – Annual Horoscope 2020-2021: सिंह राशीच्या व्यक्तींना शत्रूवर विजय, प्रवासाचा लाभ

Virgo – Annual Horoscope 2020-2021: कन्या राशीच्या व्यक्तींना पदवी- पुरस्कारांचा योग

Libra – Annual Horoscope 2020-2021: तूळ राशीच्या व्यक्तींची जागेची कामे होतील यशस्वी

Scorpio – Annual Horoscope 2020-2021: वृश्‍चिक राशीच्या व्यक्तींना राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेच्या पदांचा योग

Sagittarius – Annual Horoscope 2020-2021: धनु राशीच्या व्यक्तींना उत्तम धनसंचय व प्रसिद्धीची संधी

Capricorn – Annual Horoscope 2020-2021: मकर राशीच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये सकारात्मक बदल

Aquarius- Annual Horoscope 2020-2021: कुंभ राशीच्या व्यक्तींना यश निश्‍चित, पण संघर्षातूनच!

Pisces – Annual Horoscope 2020-2021: मीन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती व प्रतिष्ठा वाढवणारे वर्ष

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.