Scrap Material E-Auction : महापालिका भंगार साहित्य ई-लिलावाद्वारे विक्री करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Scrap Material E-Auction) विविध विभागाकडील जुने व निरुपयोगी झालेले भंगार साहित्य ई-लिलावाद्वारे विक्री करणे तसेच महापालिकेच्या परिसरात मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पुणे महापालिकेसोबत संयुक्तरित्या राबविण्याबाबतच्या विषयाला आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे 15 कोटी 86 लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना आजच्या बैठकीत मंजुरी दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.

Pimpri Corona Update: शहरात आज 30 नवीन रुग्णांची नोंद; 51 जणांना डिस्चार्ज

स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या विषयांमध्ये (Scrap Material E-Auction) विविध खर्चाच्या मान्यतेचा समावेश होता.  यामध्ये निगडी येथील पीएमपीएमएल बस डेपो मध्ये बस चार्जिंग करीता उच्चदाब विद्युत पुरवठा घेण्याकरिता महापारेषण कंपनीस बे उभारणीच्या कामासाठी तसेच सुपरव्हिजन चार्जेस अदा करण्याबाबतच्या खर्चास, महापालिकेच्या नेहरू नगर व खराळवाडी येथील शाळा व इतर इमारतीचे रंगरंगोटी देखभाल दुरुस्ती व स्थापत्य विषयक कामांच्या खर्चास, महापालिकेच्या संगीत अकादमी मार्फत ‘दीपावली पहाट 2022’ या कार्यक्रम आयोजनाबाबतच्या खर्चास स्थायी समितीची मान्यता आवश्यक होती. त्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

या विषयांसह तरतूद वर्गीकरण आणि विशेष नियोजन प्राधिकरणाच्या कामकाजाकरीता मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या तसेच विविध कामांच्या मुदतवाढीच्या विषयांना देखील आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.