Sputnik-V : स्पुटनिक-व्ही लसीची दुसरी खेप भारतात दाखल

948 रुपयांना मिळणार लस

एमपीसी न्यूज : आज स्पुटनिक-व्ही लसीची दुसरी खेप हैदराबादला आली आहे. यापूर्वी, 1 मे रोजी लसींची पहिली खेप भारतात पोहोचली होती. 13 मे रोजी सेंट्रल ड्रग लॅबरोटरी काऊन्सिलने या लसीला मंजुरी दिली आहे.  भारतात लसीकरणाच्या मोहिमेत आता रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचा समावेश होणार आहे. नागरिकांना लवकरच रशियाची स्पुटनिक-व्ही लस दिली जाणार आहे.

पुढील आठवड्यापासून देशात स्पुटनिक व्ही लस देणे सुरू होऊ शकेल. जुलैपासून स्पुटनिक देशात उत्पादन सुरू करणार आहे. सध्या देशात लसीकरण मोहिमेमध्ये दोन लसी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन वापरल्या जात आहेत. स्पुटनिक व्ही रशियाच्या गामालेया नॅशनल सेंटरने विकसित केले आहे.

रशियाचे भारतातील राजदूत निकोले कुडाशिव यांनी म्हटले की, रशियन तज्ञांनी घोषणा केली की, कोविडच्या नव्या स्ट्रेनसाठी देखील ही लस प्रभावी आहे. या लसीची किंमत सध्या 948 रुपये प्रति डोस आणि 5 टक्के GST अशी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.