Pune News : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा दुसरा दीक्षांत समारंभ संपन्न

एमपीसी न्यूज : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे चा दुसरा दीक्षांत समारंभ गुरुवारी कोविड नियमांचेपालन करून मिश्र स्वरूपात आयोजित करण्यात आला. या दीक्षांत समारंभासाठी महाराष्ट्र सरकारचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे प्रमुख पाहुणे होते.

कुलपती, डॉ. एस.बी. मुजुमदार, प्र- कुलपती, डॉ. स्वाती मुजुमदार आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अश्विनी कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत साजरा झाला. या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस.बी. मुजुमदार होते.

सिंबायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) हे अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विद्यापीठ आहे. विद्यापीठात आर्किटेक्चर, ऑटोमोबाईल, मेकॅट्रॉनिक्स, कन्स्ट्रक्शन, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, रिटेल, लॉजिस्टिक्स, पोर्ट्स, डिजिटल मीडिया, फिनटेक आणि ब्युटी अँड वेलनेस या विषयातील विविध कार्यक्रमांचा पाठपुरावा करणारे 3000 हून अधिक विद्यार्थी आहेत.

सिंबायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मध्ये शैक्षणिक पदवी आणि उद्योगासाठी आवश्यक कौशल्ये यांच्यातील दरी कमी करून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्यामुळे श्री आदित्य ठाकरेजी यांनी सिंबायोसिस स्किल युनिव्हर्सिटीचे  कौतुक केले.

ते म्हणाले की, डॉ. एस.बी. मुजुमदार आणि डॉ. स्वाती मुजुमदार यांनी महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विकास विद्यापीठ स्थापना करून एक प्रकारे सामाजिक गुंतवणूकच  केली आहे, ज्याचा समाजाला मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि आपल्या देशाचा विकास होईल. शिक्षणाचे रूपांतर ज्ञानात, तर ज्ञानाचे रूपांतर कौशल्यात करून अनुभवावर आधारित शिक्षणाच्या पद्धतीवर भर दिला गेला पाहिजे असेही ते म्हणाले.

डॉ. एस.बी. मुजुमदार, कुलपती सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांनी उत्तीर्ण झालेल्या तरुण पदवीधरांना यशाचा मौल्यवान मंत्र दिला, जर विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी डोकयात सतत नाविन्याचा शोध घेत राहिला पाहिजे, हृदयात इतरांविषयीची करुणा बाळगली पाहिजे आणि आणि  पोटात ध्येयप्राप्तीसाठीची धडपड जपली पाहिजे.  पुढे ते म्हणाले आपण सगळ्यांनीच करोनातून 3 धडे शिकले  पाहिजेत ते म्हणजे आपण आपल्या जगण्यात  कुटुंब आणि नातेवाईकांचे महत्वाचे स्थानआहे याची जाण ठेवली पाहिजे,  स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता बाळगली पाहिजे आणि सामाजिक ऐक्याने समाजात राहिले पाहिजे.

डॉ. स्वाती मुजुमदार सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या, प्र- कुलपती म्हणाल्या की, सिंबायोसिस स्किल युनिव्हर्सिटीच्या यशात सर्वात मोठा वाटा विद्यार्थ्यांच्या 100% प्लेसमेंट आणि विद्यार्थ्यांमधे  रुजवलेली उद्योगशीलता हेच आहे. करोनाकाळातही विद्याथ्यांनी आपले शिक्षण यशस्वीपने पूर्ण केल्यामुळे डॉ. स्वाती मुजुमदार यांनी सर्व पुरस्कार विजेते आणि पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

यावर्षीपासून सुरु केलेल्या आत्मनिर्भर पुरस्कारांविषयी बोलताना त्या म्हणाल्या, या पुरस्कारांमुळे इतर विद्यार्थीही प्रेरणा घेऊन यशस्वी उद्योजक बनतील आणि इतरांसाठी नोकरीच्या संधी निर्माण करतील. आत्मनिर्भर पुरस्कार हे एक प्रकारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‘स्किल इंडिया व्हिजन’ ला बळ देणारेच आहे. विद्यापीठातील अल्पकालीन कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय  सुरु केलेल्या विद्यार्थ्यांना व नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवलेल्या  5 विद्यार्थ्यांना कुशल पुरस्काराने यावर्षी पुरस्कृत केले.

एसएसपीयूचे कुलगुरू डॉ. अश्विनीकुमार शर्मा यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. 

विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात 395 विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आरती संदीप गावंडे यांनी एम.एस्सी. न्यूट्रिशन सायन्स आणि बीबीए लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटचे  समीर अशोक बागल यांना मनाचे कुलपती सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. विविध पदवी आणि पदविका कार्यक्रमातील आठ प्रथम विद्यार्थ्यांना कुलपती एस बी मुजुमदार यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली.

या वर्षीच्या आत्मनिर्भर पुरस्काराच्या पहिल्या प्राप्तकर्त्या सुश्री निकिता आर्ज्योनी होत्या, ज्यांनी एका वर्षात 15 लाखांच्या उलाढालीसह Nutriniks नावाचा स्वतःचा उपक्रम सुरू केला. B. Tech Mechatronics चा विद्यार्थी तेजस आनंद यास दुसरा आत्मनिर्भर पुरस्कार देण्यात आला.  तेजसने अर्का आनंद ऑटोमेशन नावाने स्वतःचा उद्योग सुरू केला आणि त्याच्या उद्योगाची उलाढाल 60 लाखांवर पोहोचवली

5 विद्यार्थ्यांना कुशल पुरस्कार प्रदान करण्यात आले. रुसाना नजीर शेख आणि रेणू मनोज शर्मा हे दोन विद्यार्थी उमेद अंतर्गत पीसीएमसीमधील कोविड विधवा या कार्यक्रमातील होते. या दोघांनीही विद्यापीठातून कौशल्यावर आधारित अल्प-कालीन अभ्यासक्रम पूर्ण करून स्वतःचा उद्योग सुरू केला आहे. जागतिक बँकेच्या कार्यक्रम – I स्टार मधील अमिता अशोक माने यांना तृतीय कुशल पुरस्कार देण्यात आला.

अमिताने कोविड दरम्यान तिची नोकरी गमावली होती आणि सिम्बायोसिसमध्ये इलेक्ट्रिक वाहन सेवा तंत्रज्ञ प्रशिक्षण घेतल्यानंतर, ती आता एका आघाडीच्या कॉर्पोरेटमध्ये वरिष्ठ सेवा कार्यकारी म्हणून कार्यरत आहे. इतर दोन पुरस्कार विजेते जेपी मॉर्गन यांच्या सहकार्याने फ्युचर रेडी स्किल्स प्रोग्रामचे आहेत. शुभम शेंडे हा कॅन्सर सर्व्हायव्हर आहे आणि त्याने सिम्बायोसिसमध्ये रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशन कोर्स पूर्ण केला आहे आणि आता ज्यलेक एंटरप्राइजेसमध्ये स्टार परफॉर्मर आहे. अक्षय भंडारी यांनी सिम्बायोसिस येथे मशीन लर्निंग प्रोग्राम पूर्ण केला आहे आणि 14 लाखांच्या वार्षिक पॅकेजसह सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.