Pimpri: पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा दुसरा बळी

पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी भागातील रहिवाशी असलेल्या आणि पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबधित महिलेचा आज सोमवारी ( दि. 20) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

या महिलेवर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शहरातील कोरोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे.

या महिलेला 18 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. महिलेचे वय 62 होते. या महिलेला किडनीचा आजार होता. त्याच्या उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आली होती. तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा देखील या महिलेला आजार होता.

दरम्यान, या महिलेला नेमकी कोरोनाची लागण कशी झाली होती, याची माहिती समजू शकली नाही. या महिलेच्या संपर्कातील चार जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.

पिंपरी-चिंचवड शहर कंटेनमेंन्ट झोन म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या महिलेवर पुण्यातच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रविवारी (दि.9) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे दोघांचा मृत्यु झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.