Pimpri news: ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा, ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस उद्या ‘या’ केंद्रांवर मिळणार

Second dose of Cowaxin & Covishield; first & second dose of Covishield will be available at these centers tomorrow.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (बुधवारी) कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोविशिल्ड’ ही लस देण्यात येणार आहे. ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला तर ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.

‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस या 8 केंद्रांवर मिळणार !

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय निगडी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी,खिवंसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अहिल्याबाई होळकर सांगवी महापालिका शाळा, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर, नवीन जिजामाता रुग्णालय आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय चिंचवड उद्या या 8 केंद्रांवर कोव्हॅक्सिन’चा पहिला डोस घेऊन 28 दिवस झालेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. 150 च्या क्षमतेने लस देण्यात येणार आहे.

 

शहरातील ‘या’ 17 केंद्रांवर उद्या ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळणार !

साई आंब्रेला संभाजीनगर दवाखाना, ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, नवीन भोसरी रुग्णालय, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, महापालिका शाळा वाकड, पिंपळेनिलख इंगोले महापालिका शाळा, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, कासारवाडी दवाखाना, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नेहरुनगर उर्दु शाळा, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, प्रेमलोक पार्क दवाखाना, महापालिका शाळा किवळे आणि बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे या 17 ठिकाणी ‘कोव्हॅक्सिन’चा 100 च्या क्षमतेने फक्त दुसरा डोस मिळणार आहे.

तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे.

‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ 40 केंद्रांवर मिळणार !

हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, रोटरी क्लब सेंटर, आरटीटीसी सेंटर, महापालिका कन्या शाळा, चिखली, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, तळवडे समाज मंदिर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजामाता पार्क फुलेनगर, महापालिका शाळा खराळवाडी, एसएस अजमेरा स्कुल, अजमेरा, दीनदयाल शाळा संत तुकारामनगर, क्वालिटी सर्कल भोसरी, समता स्कुल चक्रपाणी वसाहत भोसरी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, महापालिका शाळा बोपखेल, सखुबाई गार्डन भोसरी,

छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, गंगोत्री पार्क दिघी, बाबा मंगल कार्यालय धावडे वस्ती, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, बास्केटबॉल ग्राऊंड स्पाईन रोड मोशी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, नटसम्राट निळू फुले रंगमंदिर सांगवी, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव, महापालिका शाळा रहाटनी, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरीवाघेरे,

फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, बिजलीनगर दवाखाना, कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, अश्विनी मेडिकल फाऊंडेशन मोरया हॉस्पिटल चिंचवड आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत 150 च्या क्षमतेने दिला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.