Pune : मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी व तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती मिरवणुकीस सुरुवात

एमपीसी न्यूज – मानाचा पहिला श्री कसबा गणपतीच्या पूजनाने सकाळी साडेदहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. त्यापाठोपाठ 15 मिनिटांच्या अंतरांनी मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती आणि तिसरा श्री गुरुजी तालीम गणपतीही मिरवणुकीत सहभागी झाले. 

तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून फिकट गुलाबी आणि पांढ-या रंगाच्या फुलांनी सजवलेल्या पालखीतून गणपतीचे प्रस्थान ठेवून टिळक पुतळा येथे दाखल झाला. श्री कसबा गणपतीनंतर तांबडी जोगेश्वरी गणपतीचे पूजन करून मिरवणुकीत सहभागी झाला.

त्यापाठोपाठ मनाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपतीचे आगमन झाले. झंडू, शेवंती, आणि तांबड्या रंगाच्या फुलांनी सजवलेल्या रथात गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली. पिवळ्या झेंडू आणि पांढ-या शेवंतीत तांबड्या रंगाच्या फुलांच्या माळांनी सजवलेला रथ आणि दर्शनी भागातील गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक दिसत होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.