BNR-HDR-TOP-Mobile

Pune : विधी समितीच्या बैठकीला अध्यक्ष, उपाध्यक्षांची दुसऱ्यांदा दांडी

एमपीसी न्यूज – विधी समिती सारख्या महत्वाच्या समितीच्या बैठकीला अध्यक्ष, उपाध्यक्षकांनी आज दुसऱ्यांदा दांडी मारली. गेल्या सहा महिन्यांत दोन वेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष व सत्ताधारी पक्षाचे सदस्य सतत गैरहजर रहात असतील तर अशा नगरसेवकांना त्या पदावर पक्ष नेते का ठेवत आहेत ? असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी उपस्थित केला.

प्रत्येक वेळी अधिकारी व उपस्थित सदस्य यांचा वेळ फुकट वाया जात असतो. आपण स्वतः आजपर्यंत दोन वेळी अध्यक्ष म्हणून कामकाज केले आहे. एवढ्या बेजबाबदार पदाधिकाऱ्यांनी त्यांना वेळ व गांभीर्य नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे ससाणे यांनी पत्राद्वारे केली आहे. आज एका कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकारी कबाडे यांच्या पदोन्नतीचा ठराव गेली दोन महिने प्रलंबित होता. तो ससाणे यांच्या अध्यक्षतेखालील सभेने मंजूर करून घेतला आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3