Spartan Monsoon League : सॅफरॉन क्रिकेट क्लबची विजयाची हॅट्रीक; कल्याण क्रिकेट क्लबचा विजयाचा चौकार

एमपीसी न्यूज – स्पार्टन क्रिकेट क्लबतर्फे आयोजित दुसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी – 20 क्रिकेट स्पर्धेत सॅफरॉन क्रिकेट क्लबने विजयाची हॅट्रीक तर, कल्याण क्रिकेट क्लबने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयाचा चौकार नोंदविला.

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत नचिकेत कुलकर्णीच्या शतकी खेळीच्या जोरावर सॅफरॉन क्रिकेट क्लबने पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबचा 149 धावांनी धुव्वा उडविला.सॅफरॉन क्रिकेट क्लबने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकामध्ये 235 धावांचा डोंगर उभा केला.नचिकेत कुलकर्णी याने 54 चेंडूत 3 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीने 101 धावांची खेळी केली.याशिवाय हिमांशु अगरवाल (नाबाद 46 धावा), शुभम खटाळे (34 धावा), रोहन देशमुख (नाबाद 20 धावा) आणि यश गर्दे (19 धावा) यांनी फलंदाजीमध्ये आपले योगदान दिले. यश गर्दे आणि नचिकेत कुलकर्णी यांनी 53 चेंडूत 93 धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.याला उत्तर देताना पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबचा डाव 86 धावांवर गडगडला.

रोहन चाणकेश्‍वरा याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कल्याण क्रिकेट क्लबने ब्राईट इलेव्हन संघाचा 10 गडी राखून सहज पराभव केला.ब्राईट इलेव्हन संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 114 धावा धावफलकावर लावता आल्या.कल्याण संघाच्या रोहन चाणकेश्‍वरा याने 15 धावात 4 गडी बाद करून भेदक गोलंदाजी केली.केतन पासळकर (नाबाद 69 धावा) आणि धर्मिन पटेल (नाबाद 39 धावा) यांच्या फलंदाजीमुळे कल्याण क्रिकेट क्लबने हे आव्हान 10.3 षटकात सहज पूर्ण केले.

सामन्याचा संक्षिप्त निकाल : गटसाखळी फेरी :
सॅफरॉन क्रिकेट क्लबः 20 षटकात 3 गडी बाद 235 धावा (नचिकेत कुलकर्णी 101 (54, 3 चौकार, 12 षटकार), हिमांशु अगरवाल नाबाद 46, शुभम खटाळे 34, रोहन देशमुख नाबाद 20, यश गर्दे 19); (भागिदारी : पहिल्या गड्यासाठी यश आणि नचिकेत 93 (53) वि.वि. पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब : 15.4 षटकात 10 गडी बाद 86 धावा (प्रसाद कुंटे 18, निखील नासेरी 14, कृष्णा भट 4 -13, नचिकेत कुलकर्णी 3 – 18); सामनावीर : नचिकेत कुलकर्णी;

ब्राईट इलेव्हन : 20 षटकात 9 गडी बाद 114 धावा (निनाद फाटक 33, कौशिक देशपांडे 19, रोहन चाणकेश्‍वरा 4 – 15, अमर खेडेकर 2 – 13) पराभूत वि. कल्याण क्रिकेट क्लब : 10.3 षटकात बिनबाद 115 धावा (केतन पासळकर नाबाद 69 (33, 7 चौकार, 5 षटकार), धर्मिन पटेल नाबाद 39); सामनावीर : रोहन चाणकेश्‍वरा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.