T -20 Cricket : दुसरी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा;रायझिंग बॉईज, रायझिंग स्टार्स एमराल्ड, कल्याण क्रिकेट क्लब संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !

एमपीसी न्यूज – स्पार्टन क्रिकेट क्लबतर्फे आयोजित दुसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी – २० क्रिकेट स्पर्धेत ( T -20 Cricket)  रायझिंग बॉईज, रायझिंग स्टार्स एमराल्ड आणि कल्याण क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.

 

 

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट (T -20 Cricket) मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत जय जे. याच्या ७८ धावांच्या खेळीमुळे रायझिंग बॉईज संघाने ऑरेंज आर्मी संघाचा ५ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑरेंज आर्मी इलेव्हन संघाने अभिषेक बोधे याच्या ७४ धावांच्या जोरावर १८.१ षटकात २०३ धावांचे आव्हान उभे केले. याचा पाठलाग करताना रायझिंग बॉईजच्या जय जे. याने ४२ चेंडूत ५ चौकार व ७ षटकारांसह ७८ धावांमुळे तसेच ओम साळुंखे (३२ धावा), विग्नेश पालवणकर (३८ धावा) आणि रोहन साळुंके (३४ धावा) यांच्यामुळे अखेरच्या षटकात आव्हान पूर्ण केले.

 

Sachin Ahir : उद्धवसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसल्याने लोक संतप्त, बंडखोरांचा राजकीय जीवनातील संन्यास सुरु

 

हेमंत पाटील याच्या अष्टपैलू खेळीमुळे रायझिंग स्टार्स एमराल्ड संघाने सन्डे क्रिकेट क्लबचा ११० धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना रायझिंग स्टार्स एमराल्ड संघाने २० षटकात १० गडी गमावून १७६ धावा धावफलकावर लावल्या. हेमंत पाटील याने ६३ धावांची खेळी केली. या आव्हानाला उत्तर देताना सन्डे क्रिकेट क्लबचा डाव ६० धावांवर संपुष्टात आला.

 

रोहीत गुगळे याच्या नाबाद ८३ धावांच्यामुळे कल्याण क्रिकेट क्लबने सॅफरॉन क्रिकेट क्लबचा ९ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सॅफरॉन क्रिकेट क्लबने १५९ धावांचे आव्हान उभे केले. यश गद्रे (३३ धावा), गणेश महापुरे (३१ धावा) आणि शिवम ठोंबर (२४ धावा) यांनी संघाला समाधानकारक धावसंख्या उभी केली. हे आव्हान कल्याण क्रिकेट क्लबने १३.४ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केले. रोहीत गुगळे (नाबाद ८३ धावा), केतन परमान (नाबाद ४३ धावा) आणि रूत्विक महाजन (३३ धावा) यांनी भक्कम फलंदाजी करून संघाला विजयी सलामी मिळवून दिली.

 

स्पर्धेचे उद्घाटन क्रिकेट प्रशिक्षक उपेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक अमित देशपांडे, विवेक कुबेर आणि ऋषिकेश पुजारी, सहभागी संघाचे खेळाडू उपस्थित होते.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी :

१) ऑरेंज आर्मी इलेव्हन : १८.१ षटकात १० गडी बाद २०३ धावा (अभिषेक बोधे ७४ (३७, १० चौकार, ३ षटकार), शंतनु आठवले २०, हरीष पटेल ४-१७, तुषार सिन्हा ३-४४) पराभूत वि. रायझिंग बॉईज – १९.५ षटकात ५ गडी बाद २०५ धावा (जय जे. ७८ (४२, ५ चौकार, ७ षटकार), ओम साळुंखे ३२, विग्नेश पालवणकर ३८, रोहन साळुंके ३४, विशाल गुप्ता २-५४); सामनावीरः जय जे.; 

 

२) रायझिंग स्टार्स एमराल्ड – २० षटकात १० गडी बाद १७६ धावा (हेमंत पाटील ६३ (३९, ८ चौकार, ३ षटकार), अभिषेक कौशिक ३२, निखील जैन २६, श्रेयस सुरवासे २-१४, सुशिल जाधव २-३४) वि.वि. सन्डे क्रिकेट क्लब – १०.१ षटकात १० गडी बाद ६० धावा (सुशिल जाधव २८, अभिजीत आर. १२, पंकज गोपालानी २-५, रविंद्र पाटील २-६); सामनावीरः हेमंत पाटील;

 

३) सॅफरॉन क्रिकेट क्लब – २० षटकात ९ गडी बाद १५९ धावा (यश गद्रे ३३, गणेश महापुरे ३१, शिवम ठोंबर २४, रोहीत गुगळे २-२३, अमर खेडेकर २-२४) पराभूत वि. कल्याण क्रिकेट क्लब – १३.४ षटकात १ गडी बाद १६२ धावा (रोहीत गुगळे नाबाद ८३ (३७, ११ चौकार, ४ षटकार), केतन परमान नाबाद ४३, रूत्विक महाजन ३३, अमूकर कडू १-२३); सामनावीरः रोहीत गुगळे;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.