BNR-HDR-TOP-Mobile

Hinjwadi : सुरक्षारक्षकास वाहन चालकाकडून मारहाण

एमपीसी न्यूज – कंपनीच्या बाहेर जाताना पंचिंग करून जा, असे सांगितल्याने वाहन चालकाने सुरक्षारक्षकास आपल्या साथीदारांसह मारहाण केली. ही घटना हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी नमबहाद्दूर लालबहाद्दूर शाही (वय 29, रा. बुचडेवस्ती, मारूंजी रोड, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनावणे व त्याचे तीन साथीदार (पूर्ण नाव, समजू शकले नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनावणे आणि फिर्यादी शाही हे दोघेही एकाच कंपनीत कामाला आहेत. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी सोनावणे हा कंपनीच्या बाहेर चालला होता. त्यावेळी फिर्यादी शाही यांनी त्यास पंचिंग करण्यास सांगितले. यामुळे चिडलेल्या सोनावणे याने फिर्यादी शाही यांना शिवीगाळ केली आणि बाहेर भेट तुझ्याकडे बघतो, अशी धमकी दिली.

त्यानंतर आपल्या साथीदारांसोबत येऊन फिर्यादी यांना लाथा बुक्‍क्‍या आणि लाकडी दांडक्‍याने मारहाण करून जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक पंडीत अहिरे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3