Pandharpur By-Election : पंढरपूर पोटनिवडणुकीत पहा कोणाला किती मते पडली 

एमपीसी न्यूज – प्रतिष्ठेच्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या समाधान अवताडे यांनी विजय मिळवला आहे. अवताडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा तीन हजार 247 मतांनी पराभव केला. 

मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपाच्या समाधान अवताडेंनी 450 मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अवताडेंना 2 हजार 844 तर भालकेंना 2 हजार 494 मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत मात्र भालकेंनी 500 हून आधिक मतांची आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीत भालकेंना 3 हजार 112 तर अवताडेंना 2 हजार 648 मतं मिळाली. तिसऱ्या फेरीअखेरीस भालकेंनी 635 मतांची आघाडी मिळवलीय. भालकेंना तिसऱ्या फेरीनंतर एकूण 8 हजार 613 मतं मिळाली आहेत तर आवताडेंना 7 हजार 978 मतं मिळाली आहेत. सातव्या फेरीपासून मात्र अवताडेंनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 19 उमेदवार रिंगणात होते. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आकडेवारीनुसार काही उमेदवारांना पडलेली मते खालील प्रमाणे.

समाधान आवताडे (भाजप) – 109450 मते

भगीरथ भालके (राष्ट्रवादी) –  105717 मते

बिराप्पा मधूकर मोटे (वंचित बहूजन आघाडी) -1196 मते

अभिजीत बिचकुले (अपक्ष) – 137

गोडसे धनंजय (बहूजन विकास आघाडी) – 1607 मते

भरत आवारे (बहूजन महा पार्टी) – 469 मते

संजय माने –  272

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.