PCMC : उद्यान विभागातर्फे उद्या सीड बॉल्स कार्यशाळा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC) महापालिकेचा उद्यान विभाग आणि उदयन शालिनी फेलोशिप प्रोग्राम यांच्या वतीने उद्या (गुरुवारी) सीड बॉल्स बनविण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. नेहरुनगर येथील गुलाब पुष्प उद्यानात सकाळी 10 ते 12 या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.

PMRDA: पीएमआरडीएला मिळाली आयकरातून सूट

शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीकोनातून जास्तीत-जास्त देशी वृक्षांची लागवड करणे. वृक्षारोपणाचे महत्व याबाबत जनजागृती करणे. शालेय विद्यार्थ्यांमघ्ये पर्यावरणाचे तसेच माझी वसुंधरेचे महत्व वृद्धिंगत केले जाणार आहे. त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन महापालिकेकडून (PCMC) करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यशाळेला शहरातील सर्व नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी, शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन उद्यान विभागाचे प्रमुख रविकिरण घोडके यांनी केले.

NCP : ‘ईडी’ सरकारचे घालीन लोटांगण

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.