Pune Crime News : पोलिसांना पाहून पळाला अन् सराईत गुन्हेगार हाती लागला

एमपीसी न्यूज : पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका व्यक्तीला पाठलाग करून पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो सराईत गुन्हेगार निघाला. गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमीमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. सुजित सुनील शेळके (वय 24) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून घरफोडी आणि दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे काही कर्मचारी कात्रज ते नवले ब्रिज या परिसरात गस्त घालत असताना त्यांना पोद्दार स्कूलजवळ एक व्यक्ती संशयास्पद रित्या उभी असताना दिसली. पोलिसांनी त्याला हटकले असता तो पळून जाऊ लागला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याच्याजवळील दुचाकी त्याने ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरून चोरल्याचे कबूल केले.

त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली अधिक चौकशी केली असता त्याला दत्तवाडी पोलिसांनी 24 सप्टेंबर 2020 पासून पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केल्याची माहिती मिळाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.