Talegoan : प्रेमगंध ध्यान-साधना शिबिरात साधकांना आध्यात्मिक अनुभूती

एमपीसी न्यूज –  प्रेमगंध ध्यान-साधना परिवाराचे संस्थापक मनोजजी जैन यांनी सोमाटणे फाटा येथील दि एमरल्ड रिसॉर्ट येथे एक दिवशीय ध्यान साधना शिबिराचे रविवार दिनांक 5-ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 5 या वेळेत आयोजन केले होते.

शिबिराची सुरुवात  मनोजजी जैन (बाबा) कर कमलांनी दिप प्रज्वलन करुन करण्यात आली. शिबिराचे सूत्र संचालन सुविद्याताई शिंदे उर्फ माँ विदेही यांनी केले. नवीन व जुने मिळून एकूण पासष्ठ साधक उपस्थित होते. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अध्यक्षा  तारामती करंडे व माजी नगरसेवक सूर्यकांत खोंड यांनीही शिबीरात भाग घेतला होता. बाबांनी स्वतः विकसीत केलेली ध्यान साधना घेण्याची पद्धत काही औरच होती. प्रत्येक साधकाला जागेवरच अनुभूति येत होती. त्यांच एकच वाक्य आहे “चर्चा नहीं… अनुभूति का विषय है यह।” शिबिरामध्ये सर्व साधकांना चांगला अनुभव आला. शेवटी उपस्थित साधकांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना बाबांनी साधकांच्या साधने बद्दलच्या शंकांच अगदी साध्या व सोप्या भाषेत निरसन करून ध्यानाच्या बाबतीत असलेला गैरसमज दूर केला.

शिबिरामध्ये तारामती करंडे, नगराध्यक्षा तळेगाव दाभाडे, नगर परिषद यांचा बाबांचा अर्धांगिनी आरती ताई जैन यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व माजी नगरसेवक  सूर्यकांत खोंड यांचा श्री. दत्तात्रय मुळीक यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. एमरल्ड रिसॉर्ट चे मॅनेजिंग डायरेक्टर  किशोर आवारे यांनी शिबिरा साठी अनमोल सहकार्य केल्याबद्दल बाबांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

सदर शिबिराला प्रेमगंध ध्यान-साधना परिवाराचे सदस्य  संजय दाभाडे,  श्वेता ताई दाभाडे,  शंकर रागमहाले,  मयुर मनोहर रामगीर,  संदिप खानेकर, सचिन गायकवाड,  गौरव जैन, प्रज्ञा ताई बांद्रे व. सारिका ताई कशाळीकर यांची उत्स्फूर्त साथ लाभली.
तसेच बाबांनी पुढील तीन दिवशीय निवासी ध्यान-साधना शिबिर भीमाशंकर जंगल रिसॉर्ट, भोरगिरी गांव, भीमाशंकर येथे दिनांक 17, 18 व 19 ऑगस्ट 2018 रोजी संपन्न होणार असल्याचे जाहीर केले.
शिवाली केकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.