Pimpri : ‘पीसीएनटीडीए’वर नगरसेवक, कार्यकर्त्यांची निवड करा

मुख्यमंत्र्यांकडे भाजप नगरसेवकाची मागणी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) अध्यक्षपदी भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव थाडे यांची नियुक्ती झाल्यानंतर आता नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची ‘पीसीएनटीडीए’वर निवड करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या हद्दीतील रहिवासी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. त्यात नगरसेवक केंदळे यांनी म्हटले आहे, 14 वर्षानंतर प्राधिकरणाला भाजपच्या राजवटीत अध्यक्ष मिळाला आहे. त्यामुळे प्राधिकरणाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. प्राधिकरणाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्राधिकरणाच्या हद्दीतील नगरसेवकांची आणि कार्यकर्त्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात यावी.

_MPC_DIR_MPU_II

नियोजनबद्ध व सर्वांगिण विकास करणे व विकसित झालेले जमिनीचे भूखंड गरजेनुसार निवासी, शैक्षणिक, औद्योगिक, वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची 14 मार्च  1972  मध्ये स्थापना झालेली आहे. तेव्हापासून या परिसरातील नागरिकांना घरे, प्लॉट, सोसायटीमधील फ्लॅट, गाळे, व्यापारी भूखंड, व्यापारी गाळे देण्यात आले आहेत. त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढलेली आहे. या लोकवस्तीला आवश्यक असणा-या मुलभूत सोयी -सुविधा पुरविण्याचे कामकाज देखील प्राधिरकरणामार्फत केले गेले.

नवनगर विकास प्राधिकरणाच्या काही क्षेत्रामध्येच 12.50 % टक्के भूमिपुत्रांचा परताव्याचा प्रश्न, संरक्षित क्षेत्र/ रेडझोन, अनधिकृत बांधकामे, हस्तांतरण, बक्षीस पत्रावर केलेले व्यवहार असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तसेच या भागातील विकासकामे करण्यासाठी काही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक प्रश्नांना, समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी प्राधिकरणाच्या हद्दीतील रहिवासी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची निवड समितीवर करावी, अशी विनंती केंदळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.