Pimpri: राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धेत अरुण पाडुळे  यांची  निवड

एमपीसी न्यूज – चेन्नई येथे सुरू असलेल्या अठ्ठावीसाव्या  जी. व्ही. मावळणकर  राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहरातील अरुण सुभाष पाडुळे  यांनी  10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत 400 पैकी 368 गुण संपादन करत राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धेसाठी  निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी भारतातून सुमारे पाच हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. 

अरुण पाडुळे गेल्या वर्षभरापासून राहटणी मधील एक्सलन्स शुटिंग या अकादमीमध्ये  प्रशिक्षक सौरभ साळवणे   यांच्याकडे नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. एक वर्षाच्या खडतर प्रवासात अनेक आव्हानांचा सामना करत त्यानी हे यश संपादन केले.

गेल्या तीन महिन्यात प्रशिक्षक सौरभ साळवणे यांनी विशेष मेहनत घेतली. वेळोवेळी त्यांना खूप मदत केली. पाच  सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी  चेन्नई येथील स्पर्धेत अरुणने घवघवीत यश संपादन करत राष्ट्रीय  स्पर्धेत निवड झाली, हेच अरुणकडून  शिक्षक दिनाचे बक्षीस असल्याचे प्रशिक्षक सौरभ  साळवणे   यांनी सांगितले. तसेच   पुढील महिन्यात राष्ट्रीय पातळीवरील  नेमबाजी स्पर्धेत  यापेक्षा चांगली कामगिरी करेन असा विश्वास अरुण पाडुळे  यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.